Manasi Naik : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर म्हणून मानसी नाईक ओळखले जाते. मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तर मानली नाईक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मानसी तिच्या अनेक पोस्ट आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिच्या आयुष्यात प्रेम आलं की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, आता मानसीनं शेअर केलेल्या एका व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मानसी  ‘भागे रे मन’ या गाण्यावर धावताना दिसत आहे. या व्हिडीओत मानसीनं निळ्या रंगाची साडी नेसली आहे. या व्हिडीओत मानसी पळताना दिसत आहे. “कुछ तो चाहत रही होंगी, इस बारिश की बूंदो की, वर्ना कौन गिरता है जमीन पर,आसमान तक पहुंचने के बाद”, असं कॅप्शन मानसीनं या व्हिडीओला दिले आहे. पण सगळ्यांचे लक्ष हे मानसीच्या परकरनं वेधले आहे. मानसीनं निळ्या रंगाच्या साडी खाली पिवळ्या रंगाचा परकर परिधान केला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी मात्र, तिची खिल्ली उडवली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मानसीला ट्रोल करत एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "अगं बाई एवढी मोठी सेलिब्रिटी आहेस तू आणि तुला निळा परकल नाही घालायला काय मानसी" . दुसरा नेटकरी म्हणाला, "पिवळ्या रंगाचा परकर का परिधान केलास." तिसरा नेटकरी म्हणाला, "काय बाई साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा". आणखी एक नेटकरी म्हणाला की “मॅचिंग लेहंगा का घातला नाही”. दुसरा नेटकरी म्हणाला, “मानसी, साडीच्या रंगाचा पेटीकोट मिळाला नाही का? पिवळ्या रंगाचा पेटीकोट का परिधान केला आहेस, तुझ्याकडे कमी कपडे नाहीत मग”.


हेही वाचा : बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो "माझं धाडसच नव्हतं पण...."


मानसीला प्रेक्षक हे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांसाठी ओळखली जाते. दरम्यान, मानसी बऱ्याच वेळा सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत येते. मानसीनं तिचं मत मांडत पोस्ट शेअर केली की बऱ्याचवेळा ती तिचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा विषयी बोलते असं नेटकरी म्हणतात.