मुंबई : भारतामध्ये #MeToo चळवळीमुळे बॉलिवूडमधील अनेक मोठ्य़ा चेहऱ्यांवर आरोप होत आहेत. बॉलिवूडनंतर आता इतर क्षेत्रातील व्यक्तींवर देखील आरोप होत आहेत. यौन शोषण, गैरवर्तवणूक, अश्लील कृत्य असे विविध आरोप महिलांकडून होत आहेत. हे आरोप अजून सिद्ध झालेले नसले तरी बॉलिवूडला मोठा डाग लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मंदाना करीमीने 'क्या कूल हैं हम' सिनेमाच्या डायरेक्टरवर यौन शोषणाचा आरोप लावला आहे. तिने म्हटलं की, 'या अनुभवामुळे मी माझं प्रोफेशन सोडण्यासाठी मजबूर झाले. ज्याच्यावर माझं खूप प्रेम होतं.


यौन शोषण म्हणजे मला स्पर्श करणं नाही. याचा अर्थ माझ्या जीवनाला नरक बनवणं आहे. मी खूप अडचणीत होते. मी याबद्दल कोणासोबतच बोलू शकत नव्हते.' असं मंदानाने म्हटलं आहे. 'क्या कूल हैं हम 3' हा सिनेमा उमेश घाडगेने डायरेक्ट केला आहे.


मंदानाने पुढे म्हटलं की, शोषण तेव्हापासून सुरु झालं जेव्हा तिने उमेशसोबत डेटवर जाण्यास नकार दिला. उमेशने गाण्यात माझे स्टेप्स बदलले आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या गाण्यात इतर लोकांना देखील घेण्यात आलं. सेटवर तो मला लवकर येण्यासाठी सांगायचा. तो मला असे कपडे घालायला सांगायचा जे माझ्यासाठी नव्हते.'