मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं पाच दिवसांपूर्वी निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली आहे. तर बेदी  आणि कौशल कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. राज कौशल यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. मंदिराला पती राजच्या आठवणी अजूनही अस्वस्थ करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीच्या आठवणी मंदिराने पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मंदिराने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्यरात्री मंदिराने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'मिस यू राजी' असं लिहिलं आहे. पती  राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली आहे. पण आता ती या वाईट परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.



गेल्या काही दिवसांपासून मंदिरा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. कधी आईसोबत तर कधी मित्रमंडळींसोबत मंदिरा दिसत आहे. फोटो व्हिडिओमध्ये मंदिरा आनंदी दिसत आहे. पण ती पतीच्या निधनाचं दुःख अद्याप पचवू शकली नाही. सोशल मीडियावर मंदिराच्या हसऱ्या चेहऱ्याच्या पोस्ट असल्या, तरी त्यामागे दु:खाची किनार आहे.


राज यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली.  आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है  या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन केलं आहे.  सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे.