मुंबई : अभिनेत्री मंद‍िरा बेदी (Mandira bedi) पती राज कौशलच्या अचानक मृत्यूने दु:खी होती. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमी चर्चेत असणारी मंदिरा बेदी काही दिवस यापासून लांब होती. पण आता अभिनेत्री सावरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या जीवनातील रोजच्या घडामोडींची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिरा बेदी फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.  जिच्यासाठी वय म्हणजे फक्त एक आकडा आहे. मंदिरा बेदी वयाच्या 50 व्या वर्षीही आपल्या फिटनेस आणि बोल्ड स्टाइलने तरुणांना थक्क करते. मंदिराचा स्वॅग तिच्या प्रत्येक फोटोमध्ये दिसतोय. 



आता व्हेकेशनच्या नव्या फोटोंमध्ये मंदिराचा सिझलिंग अवतार चाहत्यांची मने जिंकत आहे. इन्स्टाग्रामवर बिकिनी फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 


दरम्यान, मंद‍िरा स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दोन्ही मुलांना वेळ देते आहे. आपल्या फिटनेसवर ही ती लक्ष देतेय. सकारात्मक पोस्ट देखील ती शेअर करत असते.