मुंबई : पती राज कौशल यांच्या निधनामुळे अभिनेत्री मंदिरा बेदी कोलमडल्या आहेत. पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कारादरम्यान मंदिरा बेदीने पतीच्या पार्थिवाला थांदा दिला. अनेक वर्षाच्या परंपरा मोडत मंदिरा बेदी हिने पतीच्या अंतिम संस्काराच्या सर्व विधी पार पाडल्या.  हे पाहून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. शिवाय पतीच्या अंतिम संस्कारा प्रसंगी मंदिराने घातलेल्या कपड्यांवर देखील ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. पण गायक सोना मोहपात्रा यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोना मोहपात्रा म्हणाली, 'काही लोक अद्यापही मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत. या गोष्टीचं अधिक आश्चर्य वाटत नाही.  आपल्या देशात इतर गोष्टींपेक्षा मुर्खता फार मोठ्या प्रमाणात आहे. ' सध्या सोनाचं परखड वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


सोना मोहपात्राने ज्याप्रकारे मंदिराचं  समर्थन केलं आहे, त्याचं प्रमाणे काही लोकांनी देखील तिचं कौतुक केलं आहे. पण काही  ट्रोलर्स मात्र तिच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. राज कौशल यांच्या निधनामुळे बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ह्रदय विकाराच्या धक्क्याने राज कौशल यांचं निधन झालं आहे. ते फक्त 49 वर्षांचे होते.