Akshay Kumar : सोशल मीडिया ही एक एक गोष्ट आहे जिथे सगळ्याच गोष्टी लगेच व्हायरल होताना दिसतात. अनेक मोठ्या गोष्टी सोशल मीडियामुळे उघड होतात. अनेकांवर होणारे अत्याचार देशभरात आणि परदेशात व्हायरल होतात, आणि सगळ्यांसमोर येतात. सध्यात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवण्यात येत आहे. इतकी भयानक परिस्थिती ही भारतातल्या मणिपूरमधील आहे. हा प्रकार दोन गटात सुरु झालेल्या भांडणामुळे झाल्याचे म्हटले जाते. त्यांचं भांडण इतक्या घाणेरड्या पद्धतीनं सुरु झाली की त्यांचा त्या महिलांवर खूप वाईट परिणाम झाला आहे. या दोन महिलांचा व्हायरल झालेला व्हिडीओ माणुसकीला काळीमा फासणारं आहे. त्यावर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं सोशल मीडिया पोस्ट शेअर करत लजास्पद असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारनं मणिपूरमध्ये झालेल्या या प्रकरणावर आज सकाळी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट द्वारे अक्षयनं आशा व्यक्त केली आहे की दोषींना खूप कठोर शिक्षा मिळायला हवी. अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षय कुमार म्हणाला, “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो आहे. दोषींना एवढी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही असे भयंकर कृत्य करण्याचा विचारही करणार नाही, अशी मी आशा करतो”.



फक्त अक्षय कुमार नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील संताप व्यक्त केला आहे. लाजीरवाणी! भयानक! अधर्म!' तर उर्मिता मातोंडकर म्हणाली, 'मणिपूरचा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. मी घाबरले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घटना मे मध्ये घडली असून त्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सत्तेच्या नशेत असलेल्या लोकांना लाज वाटायला हवी.'




हेही वाचा : महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवलं! जमावाकडून शेतात सामूहिक अत्याचार, मणिपूरमधील घटनेनं देशभरात संताप


रेणूका शहाणे म्हणाल्या, 'मणिपूरमध्ये हा अत्याचार थांबवण्यासाठी कोणी नाही का? जर तुम्हाला या दोन महिलांचा व्हिडीओ पाहून वाईट वाटलं नाही तर, स्वत: ला एक माणून म्हणणं चुकीचं आहे. भारतीया किंवा इंडियन हे सोडून द्या.' 



मणिपूरमधील हा धक्कादायक व्हिडीओ दोन गटातील भांडणानंतर झालेल्या माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या व्हिडीओला पाहून संपूर्ण देशाला लाज वाटते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काही लोक दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या महिला सतत मदत मागताना दिसत आहेत. तर त्यांच्या आजुबाजूसा असणारे सगळेच लोक बेशर्मीच्या सगळ्या हद्द पार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर असं म्हटलं जात आहे की एका आदिवासी समुहानं या दोनही महिलांना खेचत शेतात घेऊन जाऊन त्यांचे रेप केले. त्यांच्या अशा क्रुर घटणेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. खरंतर ही घटना 4 मे ची असल्याचे म्हटले जात आहे. इतंकच नाही तर या लोकांनी 3 महिलांसोबत असं केलं, त्यातून दोन महिलांचा व्हिडीओ समोर आला आहे.