मुंबई : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन 'मनमर्जिया' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुन्हा परततोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झालीय. त्यावेळी अभिषेकनं याची सोशल मीडियावर माहिती देली होती. आता त्यानं पुन्हा एक ट्विट करत आपल्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक जाहीर केलाय.


या सिनेमात अभिषेक पहिल्यांदाच एका सरदार बनलेला दिसणार आहे. सिनेमाच्या फर्स्टलूकमध्ये अभिषेकनं पगडी बांधलेली दिसतेय. 


या सिनेमात अभिषेकसोबतच विक्की कौशल आणि तापसी पन्नू यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. मेकर्सनं त्यांचाही लूक शेअर केलाय. 


या फोटोत तापसी नेहमीप्रमाणेच बिनधास्त भूमिकेत दिसतेय... तर अभिषेक मात्र खूपच गंभीर दिसतोय. 'जेव्हा प्रेम हेच युद्ध असतं... तेव्हा सर्व काही योग्य असतं' असं ट्विट त्यांनी यासोबत केलंय. 


या सिनेमाची निर्मिती आनंद एल राय आणि अनुराग कश्यप करत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अनुरागनं केलंय. या सिनेमाचा काही भाग अमृतसर तर काही भाग दिल्ली आणि काश्मीरमध्ये शूट करण्यात आलाय. हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.