मुंबई : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरचं नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द हृताने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं होतं. ज्या व्यक्तीने सर्वांच्या लाडक्या हृताच्या मनात राज्य केलं आहे.  त्या व्यक्तीचं नाव प्रतिक शाह आहे. आता हृताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकताच साखरपुडा पार पडला आहे. हृताच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रतिक शाहसोबत डान्स करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी एक फोटो शेअर करत हृताने  पोस्टला #8daystogo असं कॅप्शन देखील दिलं होतं. त्यामुळे 8 दिवसांनंतर हृता आणि प्रतिक त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करतील असंही म्हटलं जात होतं.   हृता सध्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेमध्ये दीपू ची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे ऋता दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.


प्रतिक शाह हा देखील सिनेमा आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत तेरी मेरी एक जिंदरी, बहु बेगम, कुछ रंग प्या के ऐसे भी, मनमोहिनी अशा अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हृता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. हृताच्या या यादीत 6 वा क्रमांक आहे. तसेच हृता ही पहिली अभिनेत्री आहे जिथे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॅन्सग्रुप आहेत.