मनोज वाजपेयी यांचे मानसिक संतुलन बिघडले? स्वतःहूनच पोस्ट शेअर करत केला खुलासा
मनोज बाजपयी यांचा `गली गुलेयां` (Gali Guliya) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
Manoj Bajpayee New OTT Release: मनोज वाजपयी हे हिंदी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि नामवंत कलाकार आहेत. आत्तापर्यंत त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांच्या अनेक भुमिका या गाजलेल्या आहेत. ओटीटीवर तर त्यांनी नव्या नव्या वेबसिरिजनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या फॅमिली मॅन या वेबशोनं तर सगळ्याच त्यांच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. मध्यंतरी प्रसिद्धी पासून दूर असलेले मनोज वाजपयी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि यावेळी कारण आहे ते त्यांची एक इन्टाग्राम पोस्ट. मनोज वाजपयींची ही पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. (manoj bajpayee on annonucing new release of ott saying he lost his mental stability for this role)
मनोज बाजपयी यांचा 'गली गुलेयां' (Gali Guliya) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच मनोजने एक नोट शेअर करत लिहिले की, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी किती मेहनत घेतली आहे याची तुम्हाला कल्पना नाही मी या भुमिकासाठी माझे मानसिक संतुलनही गमावले होते.
चित्रपटाचे पोस्टर अपलोड करताना मनोज यांनी (Social Media Caption) कॅप्शनमध्ये लिहिले की, "या भूमिकेच्या तयारी दरम्यान मी माझी मानसिक स्थिरता गमावण्याच्या मार्गावर होतो त्यामुळे मला शूटिंग थांबवावे लागले. "गली गुलेयां" मधील भुमिका ही आजवरची सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे! शेवटी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांद्वारेही नाव कमावले आहे आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
हा चित्रपट माझ्या देशातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध व्हावा अशी माझी इच्छा असली तरी असे करणे ही एक लढाई होती आणि शेवटी ती फळाला आली. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी तुमच्या सर्वांसोबत हे शेअर करायला किती उत्सुक आहे आणि मला आशा आहे की तुम्हालाही हा चित्रपट आवडेल.”
मनोज म्हणाले, “चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते दीपेश जैन (Dipesh Jain) यांनी यांनीच या चित्रपटाला एक नवी उभारी दिली आहे, अशी पोस्ट करत त्यांनी सर्वच टीमचे आभार मानले आहेत. हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. गली गुलेयां या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन दिपेश जैन यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर शोरे (Ranvir), नीरज काबी, शहाना गोस्वामी आणि ओम सिंग यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये गौरव - हा चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मामि (MAMI) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लॉस एंजेलिस चित्रपट महोत्सव, अटलांटा चित्रपट महोत्सव, क्लीव्हलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तर फेस्टिव्हल आणि 2018 इंडियन इट मेलबर्नच्या फिल्म फेस्टिव्हलसह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे.