Adipurush Manoj Muntashir: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडसह सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेला 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होताच टीकेचा धनी झाला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवरुन प्रेक्षक ट्रोल करत असतानाच त्यातील काही संवादही प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. त्यातील एक डायलॉग तर सर्वाधिक टीकेचा बळी ठरला आहे. हनुमानाच्या (Hanuman) तोंडी असणाऱ्या एका डायलॉगमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का..तो जलेगी भी तेरे बाप की' या डायलॉगवर टीका होत असतानाच संवाद लेख मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण जाणुनबुजून हा संवाद लिहिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जाणारा आदिपुरुष (Adipurush) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर चित्रपटातील संवादांवरुन टीका होत असून वाद निर्माण झाला आहे. याच वादात आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या डायलॉगवरुन वाद निर्माण झाला आहे तो जाणुनबुजून तसा लिहिण्यात आला आहे, जेणेकरुन आजच्या पिढीतील लोक त्याच्याशी जोडले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. 


मनोज मुंतशीर यांनी एका मुलाखतीत हनुमानाच्या तोंडी असणाऱ्या या वादग्रस्त संवादावर भाष्य करताना सांगितलं की, "फक्त हनुमानाबद्दल का बोललं जात आहे. जर चर्चाच करायची असेल तर प्रभू श्रीराम यांच्या तोंडी असणाऱ्या संवादावरही बोललं पाहिजे. तसंच सीतामाता जेव्हा अशोक वाटिकेत बसून रावणाला आव्हान देत सांगते की, तुझ्या लंकेत इतकं सोनं नाही की जानकीचं प्रेम खरेदी करु शकतं, त्याच्यावर चर्चा का होत नाही?".


मनोज मुंतशीर (Manoj Muntashir Controversy) यांनी यावेळी आपण लिहिलेले डायलॉग कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं आहे. हनुमानाच्या तोंडी असणारे संवाद एका प्रक्रियेतून गेले आहेत. आम्ही ते फार सहज ठेवले आहेत. एकाच चित्रपटात इतके पात्र असताना प्रत्येकजण एकाच भाषेत बोलू शकत नाही. अशा स्थितीत काहीतरी वेगळं असण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 


पहिल्यांदा नाही लिहिले असे संवाद 


मनोज मुंतशीर यांनी पुढे सांगितलं की, "आमच्याकडे कथा वाचनाची परंपरा आहे. रामायण एक असा ग्रंथ आहे जो आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तो एक अखंड ग्रंथ आहे. त्यासाठी कथा सांगणारे असतात. मी एका छोट्या गावातून आले आहे, तेव्हा आमच्या आजी कथा सांगायच्या. त्यामुळे ती याच भाषेत कथन करायची. हा संवाद (कपडा तेरे बाप का…) जो मी लिहिला आहे तो या देशातील अनेक महान संत, महान कथाकार असंच लिहितात, असे संवाद लिहिणारा मी पहिला नाही. होय, हे आधीपासून आहे".