Mansi Taxak on bobby deol : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या 'ॲनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे बोलायचं झालं तर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संसदेत सुद्दा यावर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी त्यांच्या मुलीविषयी सांगितलं आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर ती मध्यांतरानंतर म्हणजेच इन्टर्व्हलनंतर बाहेर रडत आली. याविषयी त्यांनी सांगितलं. चित्रपटात दाखवण्यात आलेले काही दृष्य हे महिला विरोधी आहेत असं अनेकांनी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मानसी तक्षक आहे. तिनं बॉबी देओलच्या तिसऱ्या पत्नीची भूमिका साकरली आहे. बॉबी आणि मानसी यांच्यात मॅरिटल रेपचा सीन दाखवण्यात आला होता. आता त्याचे समर्थन करत मानसी पुढे आली आहे. मानसी म्हणाली की या सीनकडे तुम्ही अत्याचार होतोय असं पाहू नका. बॉबीच्यानं साकारलेल्या पात्रानं माझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण जर त्या सीनला ट्वीस्ट करून पाहिलं तर त्यात दाखवण्यात आलं आहे की अबरार हा त्यावेळी अॅनिमल इंस्टिंक्टमध्ये होता, हे आपल्याला चित्रपटात दिसलं. त्यामुळे अबरारनं माझ्यावर नाही तर त्यांनी त्या सीनमध्ये त्यांच्या सगळ्या पत्नींवर त्याला असलेलं फ्रस्ट्रेशन काढलं आहे.



'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत मानसी यावर स्पष्टपणे बोलली आहे. जेव्हा अबरारला सीनमध्ये भावाच्या हत्येची बातमी आली तेव्हा त्याला राग आला. सगळ्यात आधी तर तो त्या मेसेंजरची हत्या करतो, त्यानंतर तो तिसऱ्या पत्नीवर जबरदस्ती करतो. यानंतर तो त्याच्या आधीच्या दोन पत्नींना बेडरूममध्ये येण्यास सांगतो आणि त्यांच्यासोबत हिंसाचार करतो. जर खऱ्या आयुष्यात असं झालं तर प्रत्येकासाठी हे धक्कादायक असेल. कोणीही त्यांच्या लग्नात असं काही करणार नाही. पण जेव्हा चित्रपटात लग्नाचा सीक्वेंस सुरु होतो तेव्हा त्याच्यात लाइट्स खूप चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलं होतं, आर्टला खूप चांगल्या पद्दतीनं दाखवलं आहे. सगळं खूपच सुंदर होतं, त्याशिवाय हा सीनमध्ये सगळे खूप सुंदर असल्याचं पाहायला मिळालं आहे, त्यानंतर अचानक हिंसाचार झाला तर तुम्हाला कसं वाटेल? आम्ही येथे हा सीन करत प्रेक्षकांना फक्त इतकंच सांगतोय की ॲनिमल येतोय.  


जर आपण रणबीरविषयी विचार करता की तो किती भयानक आहे तर खलनायकाचा विचार करा की तो किती भयानक असेल. बॉबीचं चित्रपटातील हे पात्र सगळ्यांसमोर उठून दिसायला हवं असं वाटतं तर मग हाच योग्य पर्याय होता. आम्हाला प्रेक्षकांना या सीनमधून हेच दाखवायचे आहे की खरा ॲनिमल कसा असतो.


हेही वाचा : 'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका


पुढे मानसी हसत म्हणाली की खऱ्या आयुष्यात माझ्या लग्नात असं काही व्हायला हवं असं मला वाटतं नाही. हे सगळं फिक्शन आहे, त्याला त्याच पद्धतीनं घ्या. खऱ्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करू नका. बॉबीची स्तुती करत पुढे म्हणाली की त्याच्याकडून तिला खूप काही शिकायला मिळालं.