Manushi Chhillar : एक सामान्य व्यक्ती ते मिस वर्ल्ड बनण्यापर्यंतचा मानुषी छिल्लरचा प्रवास आणि ते आता बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेत्री म्हणून समोर आली. मानुषीचा प्रवास हा नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पण तुम्हाला माहित आहे का की तिचं स्वप्न हे कधीच अभिनेत्री बनण्याचं नसून डॉक्टर बनण्याचं होतं? मानुषी छिल्लरला एमबीबीएस करायचं होतं पण या ब्युटी क्वीनसाठी काहीतरी वेगळं करायचं अशी देवाची इच्छा होती असं म्हणायला हरकत नाही. मानुषी छिल्लरनं यापूर्वी खुलासा केला होता की तिच्या आईनंच तिला या स्पर्धेत भाग घेण्यास भाग पाडले होते आणि जेव्हा ती जिंकली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. ती केवळ एस्टी लॉडर या आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा बनली नाही तर चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या संधीनं तिला अनेक गोष्टी मिळत गेल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानुषीचा आज 14 मे रोजी 27 वा वाढदिवस आहे. मिस वर्ल्ड 2017 च्या स्पर्धत मानुषीच्या डोक्यावर तो ताज सजला होता. त्यानंतर हळू-हळू मानुषी अभिनय क्षेत्राकडे वळली. 



2022 मध्ये मानुषी छिल्लरनं संधी मिळवली आणि 'सम्राट पृथ्वीराज' या पीरियड ड्रामामध्ये काम केलं. ज्यानं अभिनेत्री म्हणून तिच्या प्रवासाची सुरुवात झाली. पीरियड ड्रामामुळं ब्युटी क्वीननं प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आणि तिच्या अभिनयानं अशा आणखी संधी उघडल्या. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ सारख्या चित्रपटातून छिल्लरनं तिच्या अभिनयाचे कौशल दाखवले आहे. तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधून परफॉर्म करण्याची तिचे स्किल्स प्रेक्षकांनी पाहिले. अभिनेत्री तिच्या या चित्रपटात प्रो राईटप्रमाणे ॲक्शन करताना दिसली होती. तिनं यात असं अॅक्शन केलं की सगळ्यांना तिला त्या भूमिकेत पाहून आनंद झाला. 


हेही वाचा : Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक


आता, मानुषीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती  'तेहरान' च्या शूटमध्ये व्यस्त आहे. यात मानुषी ही जॉन अब्राहमसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनयाच्या पलीकडे ही अभिनेत्री उद्योजक बनली आहे. तिने अलीकडेच तिचा स्विमवेअर ब्रँड DWEEP लाँच केला आहे.