मुंबई : तब्बल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला 'मिस वर्ल्ड' हे किताब मानुषी छिल्लरने पटकावून दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस वर्ल्ड २०१७' हा मानाचा किताब जिंकण्यात ज्याप्रमाणे तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. अगदी त्याच प्रमाणे या यशात एका मराठमोळ्या व्यक्तीचा देखील महत्वाचा वाटा आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक नकुल घाणेकर. नकुलचं आता सर्वच स्तरावरून कौतुक होतं आहे. 


अशी करून घेतली 'मानुषी' करून तयारी  


‘मिस वर्ल्ड’साठी मानुषी तयार करत असताना तिच्या टॅलेंट राऊंडची तयारी त्यानं करून घेतली होती. तिनं सादर केलेल्या नृत्याचं दिग्दर्शनही त्यानं केलं होतं. 'मेरे ढोलना' या गाण्यावर मानुषीनं एक भरतनाट्यम-कुचीपुडी मिक्स असा परफॉर्मन्स केला. 


तर लोककला सादर करण्यासाठी तिनं 'नगाडे संग ढोल बाजे' या गाण्यावर राजस्थानी लोकनृत्य केलं होतं. मानुषीच्या या यशात नकुलचाही थोडा वाटा असणं ही मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तिनं विजेतेपदाच्या मुकुटावर भारताचं नाव कोरलं तेव्हा नकुलचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


मानुषीच्या प्रयत्नांना यश मिळेल याची मला सुरुवातीपासून खात्री होती. इतक्या वर्षांनी तिनं भारताला मिळवून दिलेला हा मान अत्यंत मोलाचा आहे. तिच्या या प्रवासात माझा सहभाग असल्याचा मला आनंदवजा अभिमान आहे. शास्त्रीय नृत्याची गोष्टच वेगळी आहे. घेतलेल्या मेहनतीचं अखेर चीज झालं. या नृत्यासोबतच मानुषीने 'आई' बाबत व्यक्त केलेलं मत परिक्षकांना भारावून टाकणार होतं. मानुषीचं हेच उत्तर आज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.