Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो. पण, तुम्ही कधी एखाद्या कलाकृतीमुळं कोणी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं ऐकलंय? असं प्रत्यक्षात घडलं होतं. 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रती अग्निहोत्री, अभिनेते कमल हासन (Kamal Hassan) यांची मध्यवर्ती भूमिका असणारा तो चित्रपट म्हणजे, 'एक दुजे के लिए'(Ek Duje Ke Liye). 


कोट्यवधींची कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या वाट्याला हे काय? (Bollywood Movies)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे हक्क सुरुवातीला कोणीही खरेदी करायला तयारच नव्हतं. पण, अवघ्या 10 लाख रुपयांच्या निर्मिती खर्चात साकारलेल्या या चित्रपटानं तब्बल 10 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला, लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहोचला, पण त्याचे परिणाम मात्र फार अनपेक्षित होते. कारण, चित्रपट पाहिल्यानंतर बहुतांश प्रेमी युगुलांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. (many couples ended their lives after seeing rati agnihotri kamal hasan starrer ek duje ke liye)


अनेकांनीच चित्रपटाचा Climax पाहून हे टोकाचं पाऊल उचललं होतं. ज्यावेळी ही सर्व प्रकरणं वाढू लागली तेव्हा अखेर शासनानं यामध्ये दखल घेत हे दृश्य चित्रपटातून हटवण्याची मागणी केली. चित्रपटातील हे दृश्य गांभीर्यानं बदलण्यातही आलं. पण, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्याच आग्रहास्तव जुन्या दृश्यासह चित्रपट प्रदर्शित होत गेला. 



(Ek Duje Ke Liye) 'एक दुजे के लिए' या एका चित्रपटामुळं रती अग्निहोत्री रातोरात प्रसिद्धीझोतात आल्या. या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या गटात नामांकनही मिळालं होतं. पण, त्यांना पुरस्कार मिळू शकला नाही. पुढे 1985 मध्ये 'तवायफ' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. 


रती यांच्या खासगी आयुष्यातील वादळ... 


बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांतून झळकलेल्या रती अग्निहोत्री यांनी 1985 मध्ये अनिल विरवानी यांच्याशी लग्न करत कलाजगताला रामराम केला. 2001 मध्ये त्यांनी या झगमगणाऱ्या जगतामध्ये पुनरागमन केलं. पण, यावेळी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेवर समाधान मानावं लागत होतं. पुढे लग्नाच्या 29 वर्षांनंतर रती यांनी पतीवर कौटुंबीक हिंसा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करत पतीपासून घटस्फोट घेतला. सध्या रती यांचा मुलगा तनुज त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे.