व्हिडिओ : जेव्हा मान्यता दत्त गाते `क्या यही प्यार है...`
मान्यता दत्तचे बर्थडे सेलिब्रेशन...
मुंबई : प्रदर्शनाच्या महिन्याभरानंतरही संजू सिनेमाचा बोलबाला सुरुच आहे. त्यातच २२ जुलैला संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा वाढदिवस होता. या बर्थडे पार्टीचे काही फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत आहेत.
मान्यताच्या वाढदिवसानिमित्त फॅमेली आणि काही जवळच्या फ्रेंड्ससोबत त्यांनी सेलिब्रेशन केले. मान्यताच्या केक कटींगवेळी तिची दोन्ही मुले बाजूला उभी आहेत. तर संजयची बहिण प्रिया दत्तही मागे उभी आहे. मान्यताच्या केक कटींगचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्याचबरोबर मान्यताचा गाण्याचा व्हिडिओही समोर आला आहे. तिने रॉकी सिनेमातील एक रोमांटिक गाणे गायले. क्या यही प्यार है... रॉकी हा संजय दत्तचा पहिला सिनेमा आहे.
संजू सिनेमा बनवण्याची कल्पनाही मान्यताचीच होती, असे संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले. त्याचबरोबर मान्यताने अनेक कठीण प्रसंगात मोलाची साथ दिल्याचेही संजयने सांगितले.