मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदिनाथने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. आता तो मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही तितकाच सक्रीय आहे. आदिनाथ हा सध्या पंचक या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने मालवणी भाषेबद्दल भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिनाथ कोठारे हा दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे. आदिनाथ कोठारे हा पंचक या चित्रपटात झळकत आहे. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच आदिनाथने झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत कोकण आणि मालवणी भाषा याबद्दल सांगितले. यावेळी आदिनाथला तुला मालवणी भाषा बोलता येते का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले. 


"...त्यादरम्यान मी कोकण जगलो"


यावेळी आदिनाथ म्हणाला, मी जर काही दिवस कोकणात असेन तर ती भाषा आपोआप अंगवळणी पडते. नाहीतर ती भाषा विसरायला होते. माझा कोकणाशी संबंध खूप वाढला आहे. माझा कोकणात फिरण्याचा खूप जास्त योग आला आहे. आम्ही 'पंचक' या चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी दीड महिना सावंतवाडीत होतो. त्यानंतर मला एक झी चा 'कोकण डायरीज' नावाचा एक शो मिळाला. त्यादरम्यान मी कोकण जगलो. 


सावंतवाडीत कोकणाची झलक मिळाली, पण कोकणात खूप काही काही बघण्यासारखं आहे. जेवढं तुम्ही बघता तितकं ते कमी आहे. जेवण, संस्कृती, नृत्यप्रकार, कला, दशावतार यासारखे अनेक प्रकार तिथे आहेत. मी कोकणात दशावतार जवळून अनुभवला आणि त्यात सहभागीही झालो. कोकणातल्या जेवणाची चवच वेगळी आहेत. नारळ, कोकम यासारख्या गोष्टी तिथे आहेत, असेही आदिनाथने यावेळी म्हटले. 



आणखी वाचा : सई ताम्हणकरला हवाय 'असा' जोडीदार, म्हणाली 'लग्न झालेले...'


दरम्यान आदिनाथ कोठारेची भूमिका असलेला 'पंचक' या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली होती. हा चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे कोकणातील खोत कुटुंबाची गोष्ट उलगडण्यात आली. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकले. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.