मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी मराठी अभिनेता मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात १७ वर्षीय पीडितेने मंदारविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेची इच्छा नसतानाही अर्धनग्न अवस्थेत फोटो काढल्याचा आरोप तिने केला आहे. पुण्यातील प्रभात रोड परिसरात हा प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदार कुलकर्णीने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पीडित मुलगी आणि मंदार कुलकर्णी यांची ओळख एका कार्यशाळेमध्ये झाली होती. अभिनयात रस असल्यामुळे एका नाटकाच्या ऑडिशनसाठी मंदारने तिला काही फोटोशूट करण्यास सांगितले. फोटोशूट करण्यासाठी संबंधीत मुलीला आपल्या घरी बोलवण्यात आले. 


मंदारने मुलीकडून वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फोटोशूट करून घेतले. अखेर बिकीनीत फोटोशूट करायला सांगितल्यानंतर ती गोंधळून गेली. तरीही तिच्याकडून बळजबरी करत फोटोशूट करून घेण्यात आले. याचदरम्यान त्याने पीडितेसोबत गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे. 


बिकीनीमध्ये फोटोशूट केल्याचे घरी सांगू नको. अशा प्रकारे तिला धमकवण्यात आले. घरी परतल्यानंतर पीडितीने घडला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.