Gaurav More On Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने राजकीय नेत्यांपासून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे अभिवादन करताना दिसत आहेत. यानिमित्ताने अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरने यानिमित्ताने एक आठवण शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव मोरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्ताने एक खास आठवण सांगितली आहे. गौरव मोरेने काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्याने घराबाहेरील काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता गौरवने लंडनमध्ये जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते आणि तिथे अभ्यास करण्यासाठी ते ज्या खुर्ची आणि टेबलचा वापर करायचे, त्या वस्तूंची झलक दाखवली आहे. 


गौरव मोरेने दाखवली खास वस्तूंची झलक


“हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता. त्या पवित्र वास्तूला मी २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. थॅंक यू बाबासाहेब! तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.” असे कॅप्शन गौरवने या पोस्टला दिले आहे. यासोबत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत काही पुस्तके, पेन व वस्तू दिसत आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक जुना फोटोही यात दिसत आहे. 


गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक चाहते, तसेच कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. यावर अभिजीत खांडकेकरनं हात जोडून नमस्कार केल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर जयवंत वाडकरांनी “नमन बाबासाहेबांना” अशी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. गौरव मोरेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



लवकरच झळकणार ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात


दरम्यान, गौरव मोरे हा लवकरच ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. त्यासोबतच गौरव हा ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.