Kiran mane on Shiv Sena MLA Disqualification Hearing : राज्याच्या सत्तानाट्याचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याबरोबर शिवसेनेच्या आमदारांना भरत गोगावलेंचाच व्हिप लागू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं आहे. आता या निकालानंतर अभिनेते किरण माने यांनी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधले. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत याबद्दलची सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर आता शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. यानंतर किरण माने यांनी या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचे सांगितले.


किरण माने यांनी फेसबुकवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्यांनी एका कवितेच्या काही ओळी शेअर केल्या आहेत. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत एक उदाहरण दिले आहे. त्यांच्या या दोन्ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.


किरण माने यांची पहिली पोस्ट


क़त्ल हुए जज़्बात की क़सम खाकर,
बुझी हुई नज़रों की कसम खाकर,
हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...
जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी...
जब तलवार न हुई, 
...लड़ने की 'लगन' तो होगी !
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की 'ज़रूरत' तो होगी !!
 हम लड़ेंगे साथी...
 हम जीतेंगे
ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे
जो दूर बड़ी... और मुश्किल है,
उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !



किरण माने यांची दुसरी पोस्ट 


यानंतर किरण मानेंनी तासाभरापूर्वी फेसबुकवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहेत. यात ते म्हणाले, औरंगजेबाने या मुलूखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता 'हिसकावणं' सोपं असतं... पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो !. सध्या त्यांच्या या दोन्ही पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यात काही समर्थक त्यांना पाठिंबा देत असून काही जण त्यांना ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 



दरम्यान किरण माने यांनी काही दिवसांपूर्वीच शिवबंधन बांधत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी ‘मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आणि राहीन. आज राज्यघटना धोक्यात आहे. मी राज्यघटना वाचवण्यासाठी लढत आहे. त्याविरोधात लढणारे एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे या लढाईत त्यांच्या पाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे. सजग नागरिक म्हणून आपण सक्रिय राजकारणात आले पाहिजे’, असे किरण माने यांनी म्हटले.