Lalit Prabhakar Nach Ga Ghuma Movie : मालकीण आणि मोलकरणीचे भावविश्व उलगडणारा 'नाच गं घुमा' हा चित्रपट गेल्या 1 मे 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांना भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. आता या चित्रपटावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेता ललित प्रभाकरने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित प्रभाकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आता ललितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने 'नाच गं घुमा' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत त्याने हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल भाष्य केले आहे. 


ललित प्रभाकरची पोस्ट


परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी हया जोडीला सलाम. मला कौतुक वाटतं की दरवेळेला ते वेगळ्या विषयाचा वेगळ्या शैलीचा सिनेमा घेऊन येतात आणि ते ही मनोरंजनाची १००% हमी घेऊन. ह्याच जोडीने मला ‘चि. व चि. सौ. का.’ हया सिनेमा मधून मोठ्या पडद्यावर आणलं. हया सिनेमाचं आणि परेश बरोबर काम करण्याच्या अनुभवाचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व खूप मोलाचं आहे. आणि मला आनंद आहे की माझा पहिला मोठ्या पडद्यावरचा cameo सुद्धा ह्याच जोडीच्या आत्ता रिलीज झालेल्या ‘नाच गं घुमा’ हया सिनेमात करायला मिळाला.


तुमचं निखळ, मन भरून आणि पोट धरून मनोरंजन करायला हा सिनेमा थिएटर्स मधे सज्ज आहे. मुक्ता आणि नम्रता हया माझ्या आवडत्या अभिनेत्रींची तुफान जुगलबंदी ह्यात आहे. पटापट तिकीटं बूक करा आणि थिएटर मधे सगळ्यांबरोबर हया सिनेमाचा आनंद घ्या. तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं ते पण सांगा. मित्रपरिवाराला खूप खूप शुभेच्छा. हलत्या चित्रांचा विजय असो, असे ललित प्रभाकरने म्हटले आहे. 


 


दरम्यान ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे.