लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय आणि विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....
हे क्षण आठवत आहेत का?
मुंबई : काही अभिनेते हे त्यांच्या कलेच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. प्रेक्षकांसाठी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे लाडका लक्ष्याच. आज हा अफलातून अभिनेता आपल्यामध्ये नसला तरीही त्यांची प्रत्येक कलाकृती ही प्रेक्षकांच्या मनाचा आजही ठाव घेते.
एखदा चित्रपट असो किंवा आणखी काही, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कायमच चाहत्यांना निखळ मनोरंजनाचा नजराणा दिला आहे, वेळ प्रसंगी काही महत्त्वाचे संदेशही दिले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी असंच एक सादरीकरण केलं होतं. ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.
व्हिडिओ गाजण्यापेक्षा सुयोग्य वेळ साधत तेव्हाच विनोदी शैलीत त्यावर वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कौशल्य या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ झी मराठीच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. 'पहिल्या वहिल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचे हे काही खास सुवर्ण क्षण तुमच्यासाठी....', असं कॅप्शन लिहित हा व्हिडिओ सर्वांसमक्ष आणला गेला आहे. हा व्हिडिओ पाहता अवघ्या काही मिनिटांमध्येच अनेकांनी त्यावर व्यक्त होत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी तो शेअरही केला. या व्हिडिओच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा लाडक्या लक्ष्याची आठवण ढाली.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
किसनदेव म्हणजेच श्रीकृष्ण आणि पेंद्या यांच्यामध्ये तत्कालीन विषयांना अनुसरुन होणारं संभाषण आणि त्यातून साधले जाणारे प्रासंगिक विनोद या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची विनोदी शैली आणि त्यांना मिळणारी प्रेक्षकांची दाद पाहता, आठवणीतले हे क्षण खूप काही सांगून जात आहेत असं म्हणायला हरकत नाही.