मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बऱ्याचदा मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींसोबत विविध विषयांवर चर्चा करताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतपासून ते स्मॉल स्क्रिनवरील अभिनेत्री रुपाली भोसले पर्यंत अनेक सेलिब्रिटींचे राजभवनातील फोटो आतापर्यंत समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच एका मराठमोळ्या अभिनेत्याने देखील थेट राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतलीये. अभिनेता अजिंक्य देव यांनी राजभवानातील एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाये.



या फोटोमध्ये अजिंक्य देव आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु असल्याचं दिसतंय.


हा फोटो शेअर करत अजिंक्य देव यांनी कॅप्शनमध्ये या भेटीमागचं कारण देखील सांगितलं आहे. "आदरणीय राज्यपालांची त्यांच्या निवासस्थानी राजभवनात जाऊन भेट घेतली. त्यांना आमच्या शाळेचे सादरीकरण देतानाचा हा फोटो आहे.. यावेळी आमच्या शाळेची अप्रतिम चर्चा झाली."


भेटीमागचं कारण सांगत अजिक्य देव यांनी राज्यपालांची भेट घेऊन आनंद झाल्याचं ही पोस्टमध्ये म्हटलंय.