मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली सुरूवात स्पॉटबॉय किंवा साईड डान्सर म्हणून केली आहे. आपल्याला याची माहिती आहेच. पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेसृष्टीतही असा एक कलाकार आहे ज्याने आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरूवात स्पॉटबॉय म्हणून केली आहे. या इंडस्ट्रीमध्ये त्याने पदार्पण केलं ते स्पॉटबॉय म्हणून. पण आता हा अभिनेता अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे.


या अभिनेत्याचे नाव आहे निखिल राऊत . 'काहे दिया परदेस' या मालिकेत त्याने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तो सध्या 'सुरक्षित अंतर ठेवा' या नाटकात आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या नाटकातील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.


 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस २०१७ मध्ये त्याला या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता' विभागात नामांकन देखील मिळाले होते. तसेच तो लवकरच एका बिग बजेट चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा अभिनयप्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी आणि त्याच्या प्रवासात छोट्या पडद्याला असलेल्या महत्त्वाविषयी त्यानेच स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला एका पोस्ट लिहिली आहे. 
 
आता जरी मोठा पडदा खुणावत असला तरी छोट्या पडद्याला विसरणं कधीच शक्य नाही. अजून खूप काही करायचंय छोट्या पडद्यावर. त्या संधीची वाट पाहतोय. परंतु अल्पशा कारकिर्दीत खूप काही शिकायला मिळालं ते या छोटय़ा पडद्या मूळेच. त्याचा आयुष्य भर ऋणी असेन. असं म्हणून त्याने ही फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.