कुणीतरी येणार गं! बेबी बंप दाखवणाऱ्या सईनं नवऱ्यासोबतचा Video शेअर करत दिली Good News
Good News : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वाढता वजनामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
Sai Lokur Pregbnant : कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी आणि मराठीमधील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो दाखवत गुडन्यूज दिली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं 'जेलर' या चित्रपटातील 'कवाला' या गाण्यावर रील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी वाढत्या वजनामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. काही नेटकऱ्यांनी तू प्रेग्नेंट आहे का असा प्रश्नही विचारला होता.
सई आणि तिचा नवरा तीर्थदीप रॉय यांनी सोशल मीडियावर ही गोड बातमी देताना अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Marathi Actor sai lokur pregnant share good news Baby bump pregnancy test photo video on instagram)
ही मराठी अभिनेत्री आहे सई लोकुर...सई आणि तीर्थदीप यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सई सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्या दोघांनी नुकतचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. घराच्या गृहप्रवेशचा व्हिडीओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
अभिनेत्रीने 'इत्ति सी हँसी, इत्ति सी खुशी' या गाण्यावर फोटो आणि व्हिडीओ लावत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सईच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याशिवाय मनोरंजन विश्वातील मित्रमंडळीनेही अभिनेत्रीला भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गमंत म्हणजे काही दिवसांपूर्वी तिच्या एका रील्समुळे ती ट्रोल झाली होती. त्यावेळी चाहत्यांनी तू प्रेग्नेंट आहेस का असा अंदाज लावला होता. तर चाहत्यांचा हा अंदाज खरा निघाला आहे.
दरम्यान सई लोकुर तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर विविध रील्स पोस्ट करत असते. यातील काही बोल्ड लूकमुळे चाहत्ये अवाक् झाले होते.