Sankarshan Karhade Post Rinku Rajguru : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच क्षेत्रात सक्रीय आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. संकर्षणने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आता संकर्षण कऱ्हाडेने अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तिचे कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या संकर्षण हा 'तू म्हणशील तसं' या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुने नुकतंच संकर्षणचे हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली. आता संकर्षण कऱ्हाडने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने रिंकू राजगुरुसोबतचे खास फोटोही पोस्ट केले आहेत. 


संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट


"काल अकलूजचा प्रयोग जोरदार झाला. प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतीसाद मिळाला. almost Houseful होता आणि काल प्रेक्षकांमध्ये स्पेशल गेस्ट पण होती रिंकू राजगुरू.... मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे. शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली..” आई बाबांना घेऊन आली.. प्रयोग पाहून हसली, रडली, कौतुक करुन गेली.. तिचा सैराट आला तेव्हा “आम्ही सारे खवय्ये” मध्ये पाहुणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. 


आता चांगले चांगले सिनेमे करते… लोकप्रियता तर काय विचारायलाच नको… पण तरीही स्वतःहून कळवून, येउन, भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली. आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत “खवय्ये” मध्ये असं पण म्हणाली.. छान वाटलं. ह्या सगळ्या तीच्या वागण्या बोलण्यात शांतता, स्थीरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती…. वचवच, माज, नखरे काही नाही… धन्यवाद रिंकू राजगुरु. तुला खूप शुभेच्छा भेटत राहू. आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे. त्यांच्या मनात एकच भाव होता… “आरची आली आरची", असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले आहे. 



दरम्यान संकर्षण कऱ्हाडेच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचा पुढील प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे. सध्या तो विविध नाटकांमध्ये झळकत आहे. ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ या नाटकात झळकत आहे. या तिन्ही नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.