Guess Who : 'बाहुबली' या चित्रपटानं सगळ्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील सगळ्याच भूमिका या लक्षवेधी होत्या. तर आपल्या सगळ्यांना बाहूबली या चित्रपटातील 'कालाकेय' ही भूमिका तर नक्कीच लक्षात असेल. आता त्या भूमिकेचा एक फोटो आपल्या समोर आला असून तुम्ही तो कोण अभिनेता आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता कालकेयच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला पाहिलं की तुम्ही म्हणाल की हा तर कालकेय आहे. मात्र, तसं नसून तो आपल्या सगळ्यांचा लाडका आणि फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील गौरव मोरे हा आहे. गौरव मोरेनं त्याचा हा लूक शेअर केला आहे. गौरव मोरे सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी कार्यक्रमात दिसत आहे. गौरवनं त्याचा हा लूक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याशिवाय गौरवनं या शोमध्ये छोट्या पंडीतचा लूकही केला होता. 



हेही वाचा : 'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट


गौरव मोरेनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. निखिल बनेकमेंट करत म्हणाला, "एक नंबर भावा." तर अनेक सेलिब्रिटीं देखील त्यांनं खूप चांगला लूक केल्याचे म्हटले आहे. तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "कालकेयचा मोठा मुलगा लंबे बालके." दुसरा नेटकरी कालकेयच्या भाषेत बोलण्याचं दाखवत कमेंट करत म्हणाला, "गोररप्पा, यकुटी नाल सिंची मूल राकट, मुसा खांडेकररा, दा समीरबहू, मोरेता दट्टू, वाणीतर, रसिकान,रस्सा संभेरावताई, इश्शडे, बंनी बांगर, पर्टमेंशा, श्रमशा, शिवली बहू बल जज्जा सर्रा प्रसाद सई ताओ कररखुरर." तिसरा नेटकरी म्हणाला, "खतरनाक रे, एकदम तसाच दिसतोय. टाळ्या भावा. मेकअप आर्टिस्टनं खूप जबरदस्त काम केलं आहे." आणखी एक नेटकरी मजेशीर कमेंट करत म्हणाला, "तरी पण जय महेशवती दादा." दुसरा नेटकरी म्हणाला, "काय भारी मेकअप केलाय... खूप छान. गौरव तुझा खूप अभिमान वाटतो. एकमेक चार्मर." त्यासोबत अनेक कलाकारांनी कमेंट करत ज्या मेकअप आर्टिस्टनं मेकअप केला आहे त्याचे कौतुक केले आहे.