Alka Kubal: `आजपासून...` धाकट्या लेकीची कामगिरी पाहून अलका कुबल भावूक, `ती` पोस्ट चर्चेत!
Alka Kubal: आपल्या मुलीनं केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी इन्टाग्राम पोस्टवरून कस्तुरीचे भरभरून कौतुक केले आहेत. ही आनंदाची बातमी अलका कबूल यांनी इन्टाग्रामवरून शेअर केली आहे.
Alka Kubal Instagram Post: आज मराठी चित्रपटाचे नावं हे जागतिक सिनेसृष्टीत अभिमानानं घेतले जाते. आज मराठी अभिनेत्रींनीही केवळ मराठीच नाही (Marathi Actresses) तर हिंदी-इंग्रजी चित्रपटांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. ओटीटीवरूनही येणाऱ्या अनेक नानाविध आशयातून त्यांच्या अभिनयाचेही कौतुक केले जाते. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल - आठल्ये (Alka Kubal Athalye) यांचे नावंही अभिमानानं घेतलं जाते. सोशिक आणि आदर्श सूनची प्रतिमा त्यांनी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यांच्या दोन्ही मुली आपल्याला क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. ईशानी आठल्ये ही पायलट झाली आहे तर कस्तुरीनंही आपल्या क्षेत्रात एक खूप मोठं पाऊल टाकलं आहे. त्याबद्दल अलका कुबल यांनी एक भावनिक पोस्ट (Alka Kubal Instagram Post) शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या मुलीनं केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी इन्टाग्राम पोस्टवरून कस्तुरीचे भरभरून कौतुक केले आहेत. ही आनंदाची बातमी अलका कबूल यांनी इन्टाग्रामवरून शेअर केली आहे. अलका कुबल-आठल्ये या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याचबरोबर त्या इन्टाग्रामवरही आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवत असतात. त्यामुळे त्यांच्या लेटेस्ट अपेडट्स (Alka Kubal Latest Instagram Post) या त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचतात. सध्या त्यांनी ही गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी नक्की काय म्हटलं त्यांच्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.
अलका कुबल यांच्या मोठ्या मुलीनं पायलटचे (Alka Kubal Daughters) प्रशिक्षण घेतले आहे. आता ती पायलट म्हणून कार्यरत आहे. तर आता कस्तुरीनं आपल्या क्षेत्रात चांगलंच यश संपादन केले आहे. कस्तुरी ही परदेशात शिकत होती. तिला डर्मिटोलॉजिस्ट व्हायचं आहे. तिनं परदेशातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे आणि तिला नुकतीच डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. याबद्दल पोस्ट करताना अलका कुबल यांनी लिहिले आहे की, ''कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून Dr. Kasturee Athalye. We are very proud of you. Best wishes''.
सध्या अलका कुबल यांची ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या या पोस्टवर कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे कस्तुरीचे सगळेच जण कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींच्या यशस्वी कामगिरीनं अलका कुबल यांनाही प्रचंड अभिमान आहे. याबद्दल त्यांची ही पोस्ट वाचून सगळ्यांनाच प्रेरणा देते आहे.
अलका कुबल यांची 'आलंय माझ्या राशीला' (Alka Kubal Upcoming Movie) या नव्या चित्रपटातून नवीकोरी भुमिका प्रेक्षकां समोर येणार आहे. यात निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांचीही प्रमुख भुमिका आहे.