मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. आता अमृताच्या एका फोटोमुळे ती पुन्हा चर्चेत आलीये. अमृतानं बिकीनीतला एक फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. अनेकदा अभिनेत्रींकडून हॉट फोटो शेअर केल्यानंतर त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. विशेष म्हणजे हा फोटो शेअर केल्यानंतर अमृतानं तिचा कॉमेन्ट बॉक्स बंद ठेवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही अनेक मराठी अभिनेत्रींनी बिकीनीमधील फोटो शेअर केलेत. यात सई ताम्हणकर, नेहा पेंडसे, रसिका सुनिल अशा अनेकींचा समावेश आहे. 



अमृता देशमुखनं छोट्या पडद्यावरुन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या मालिकेत अमृता दिसली होती. काही महिन्यांपूर्वीत अमृतानं स्वीटी सातारकर या सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.