Ashwini Mahangade Home Griha Pravesh : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील सर्वच कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या मालिकेचा चाहता वर्ग फार मोठा आहे. या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. यात अश्विनी ही अनघा हे पात्र साकारत आहे. आता अश्विनीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. तिने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आता अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. "आमच्या सगळ्यांचे घर. माझ्या माणसांमुळे घराला घरपण आहे", असे अश्विनीने म्हटले आहे. अश्विनीने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत नवीन घर खरेदी केले होते. आता तिने या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


अश्विनीने शेअर केला घराचा व्हिडीओ


या व्हिडीओच्या सुरुवातीला तिच्या घरातील भिंतीवर स्वस्तिक पाहायला मिळत आहे. त्यासोबतच स्वामी समर्थ, बाळकृष्ण, गणपती बाप्पा आणि देवीची अशा विविध देवी देवतांच्या मुर्त्या पाहायला मिळत आहे. यानंतर तिच्या घरात सुरु असलेली पूजा, तिच्या घरी जमलेले नातेवाईक आणि तिने घरात केलेला गृहप्रवेश या सर्वाची झलक या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यावेळी तिने तिच्या किचनची झलकही दाखवली आहे. सध्या अश्विनीच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



कलाकारांसह चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव


अश्विनीच्या या व्हिडीओवर मधुराणी प्रभुलकरने "मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो", अशी कमेंट केली आहे. तर तिच्या एका चाहत्याने "अशीच खूप घर तुझी होऊ देत हिच स्वामी चरणी प्रार्थना", असे म्हटले आहे. तर एकाने "नवीन वस्तू पूजन अभिनंदन", अशी कमेंट केली आहे. 


अश्विनी महांगडेला मिळालंय म्हाडाचं घर


दरम्यान अश्विनी महांगडेला म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत कलाकार कोट्यातून गोरेगावमध्ये घर मिळाले आहे. तिने घराच्या चाव्या मिळाल्यानंतर मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले होते. अश्विनी ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय झाली. आता लवकरच ती मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे.