Bhagyashree Mote Vijay Palande Breakup : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. ‘देवो के देव महादेव’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. भाग्यश्री ही सातत्याने चर्चेत असते. आता भाग्यश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. भाग्यश्रीने 2022 मध्ये मेकअप आर्टिस्ट असलेल्या विजय पालांडेसोबत साखरपुडा केला होता. पण आता तिने वेगळं झाल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाग्यश्री ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणून तिला ओळखले जाते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पण काही तासांपूर्वी भाग्यश्रीने एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्रीने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबद्दल सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. 


भाग्यश्री मोटेची पोस्ट


"नमस्कार मित्र-मंडळी, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बराच काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. पण आता आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. धन्यवाद", अशी पोस्ट भाग्यश्री मोटेने केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला कारण विचारले आहे. तर काहींनी "तिला काळजी घे, तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा" असे सांगितले आहे. 



दीड वर्षांनी ब्रेकअपची घोषणा


भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांनी 10 ऑक्टोबर 2022 रोजी साखरपुडा केला होता. ते दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघेही कायमच एकमेकांसोबत फोटो पोस्ट करताना दिसायचे. भाग्यश्री आणि विजयचे साखरपुड्याच्या फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भाग्यश्री आणि विजयच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने हजेरी लावली होती. विजय पालांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट म्हणून तो सध्या काम करतो. त्यासोबतच त्याने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींबरोबर काम केलं आहे. साखरपुडा केल्यानंतर दीड वर्षांनी भाग्यश्रीने ब्रेकअपची घोषणा केली आहे.


दरम्यान भाग्यश्री ही ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून नावारुपाला आली. तिने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' या चित्रपटात झळकली. तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.