पिंपल्स, डार्क सर्कल्स अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?
ती आतापर्यंत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही भूमिकेत झळकली आहे. तिच्या कामाचे नेहमीच कौतुक होताना दिसते.
Dhanashri Kadgaonkar No Make Up Look : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून धनश्री काडगावकरला ओळखले जाते. धनश्री काडगांवकरने आतापर्यंत विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता धनश्रीने तिचा नो मेकअप लूकमधील फोटो पोस्ट केला आहे.
धनश्रीचा नो मेकअप लूकमधील फोटो
धनश्री ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून ती 'तू चाल पुढे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यात तिने शिल्पी हे पात्र साकारले होते. यात तिची भूमिका ही ग्रे शेडमधील होती. आता धनश्रीने नुकतंच नो मेकअप लूकमधील फोटो पोस्ट केला आहे.
धनश्रीकडून त्वचेची काळजी घेण्याचे आवाहन
धनश्रीने इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोत अजिबात मेकअप नसलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहे. यावेळी तिने तिचे केसही मोकळे सोडले आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती डोळे बंद करत हसताना दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळ पूर्णपणे दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोत ती गोड हसताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने "गुड स्कीन डे, नो मेकअप, नो फिल्टर" असे म्हटले आहे. त्याबरोबरच तिने त्वचेची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
ठाण्यात खरेदी केली दोन घरं
धनश्रीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर काहींनी तिच्या पोस्टवर 'वहिनी साहेब' अशी कमेंट केली आहे. दरम्यान धनश्री काडगावकर ही आतापर्यंत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही भूमिकेत झळकली आहे. प्रेक्षकही तिच्या कामाचे नेहमीच कौतुक करताना दिसतात. मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणारी धनश्री खऱ्या आयुष्यात खूप प्रेमळ आणि नम्र आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने ठाण्यात नवीन घर खरेदी केलं आहे. धनश्रीने ठाणे पश्चिम या ठिकाणी दोन घरं खरेदी केली आहेत. यातील एक वन बीएचके आणि दुसरा टू बीएचके आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या दोन्ही घरांचा व्हिडीओ शेअर केला होता.