मुंबई : विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. सगळे पक्ष आपापल्या परिने जोर लावून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. असं असताना कलाकार मंडळी देखील काही मागे राहिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवी म्हणाली की, एखाद्या सणासारखे आपण मतदानाला जायला हवे. तरुणांनी आणि प्रत्येकानेच आपण मतदान का करतो हे लक्षात घेऊन मतदानाला जाणे आवश्यक आहे. केवळ सेल्फीसाठी मतदान न करता विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे बोरीवली येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमात ती बोलत होती. (हे पण वाचा - स्वत:साठी मतदान करा; भारत गणेशपुरेचं आवाहन)


महिला मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या तर कुटुंबातील इतर व्यक्तीही बाहेर पडतील त्यामुळे महिलांनी 21 ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने बाहेर पडावे असे आवाहन यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांना त्यांनी केले. कार्यक्रमाला स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे संस्थाचालक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षक, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. 


निशा परुळेकर म्हणाल्या, लोकशाही यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने वाटा उचलणे गरजेचे आहे. मतदानाची टक्केवारी वाढविणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मताची किंमत न करता प्रत्येकाने जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे. तसेच धीरज शर्मा या दिव्यांग व्यक्तीने अमिन सयानी, निळू फुले, राजेश खन्ना, नाना पाटेकर, अमोल पालेकर या अभिनेत्यांच्या नकला करत उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले.