मुंबई : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरचं नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द हृताने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं होतं. ज्या व्यक्तीने सर्वांच्या लाडक्या हृताच्या मनात राज्य केलं आहे, त्या व्यक्तीचं नाव प्रतिक शाह आहे. आता देखील तिने प्रतिकसोबत एक फोटो पोस्ट करत लग्नाची हिंट दिली आहे. सध्या हृता आणि प्रतिकचा खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मी इतकी भाग्यवान कशी असू शकते... कधीही न संपणारा आनंद, नॉनस्टॉप बडबड, अवास्तव आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम... आज आणि कायमचे आहे...' असं लिहित हृताने प्रतिकचे आभार मानले आहेत. 



एवढंच नाही तर हृताने पोस्टला #8daystogo असं कॅप्शन देखील दिलं आहे. त्यामुळे 8 दिवसांनंतर हृता आणि प्रतिक त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करतील असं म्हणायला हरकत नाही. 8 दिवसांनंतर म्हणजे हृता आणि प्रतिक 24 तारखेला सप्तपदी घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


हृता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. हृताच्या या यादीत 6 वा क्रमांक आहे. तसेच हृता ही पहिली अभिनेत्री आहे जिथे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॅन्सग्रुप आहेत.