Jui Gadkari Cast Answer : ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारले होते. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिने सायली हे पात्र साकारले होते. गेल्या वर्षभरापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. सध्या मालिकाविश्व गाजवणारी दमदार अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. नुकतंच जुई गडकरीने तिच्या जातीबद्दल खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर 'अ क्वीक क्वेशन अॅन्ड अॅन्सर' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिला चाहत्यांनी खासगी आयुष्यासह मालिकेबद्दलही विविध प्रश्न विचारले. त्यावर तिने हटके पद्धतीने उत्तर दिले. 


हेही वाचा : एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्रींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, सुकन्या मोने म्हणाल्या 'आम्हाला...'



जुई गडकरीचे चाहत्याला हटके उत्तर


या सेशनदरम्यान जुई गडकरीला एका चाहत्याने ताई तुझी जात कोणती आहे? असा प्रश्न विचारला आहे. यावर जुईने फारच हटके पद्धतीने उत्तर दिले. यावेळी जुईने मी भारतीय आहे असे उत्तर दिले आहे. तिच्या या उत्तराने तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत. यादरम्यान जुई गडकरीने नाटकात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. मला नाटकात काम करायला नक्कीच आवडेल. मी एका चांगल्या संधीची प्रतीक्षा करत आहे, असे जुईने म्हटले. 



हेही वाचा : आदेश बांदेकरांचा लेक अडकणार विवाहबंधनात, चाहत्याला दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण


दरम्यान जुई गडकरी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. 'पुढचं पाऊल','तुजवीण सख्या रे','बिग बॉस मराठी 1','माझिया प्रियाला प्रीत कळेना' यासांरख्या मालिकांमध्ये ती झळकली. सध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यात तिने सायली हे पात्र साकारले आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील पहिल्या क्रमांकावर आहे. ती अनेकदा मालिकेच्या सेटवरील गंमतीजमतींबद्दल फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.