पूजा सावंत `या` नावाने मारते नवऱ्याला हाक, म्हणाली `आता...`
पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेशने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Pooja Sawant Birthday Post : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. मराठीतील टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून पूजा सावंत ही तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. पूजा सावंत ही लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आज पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेशने खास पोस्ट शेअर केली आहे.
पूजा सावंत ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. पूजा सावंतचा होणारा नवरा सिद्धेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने पूजा सावंतचा केक कापतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तर एका फोटोत ते दोघेही रोमँटिंक अंदाजात दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना सिद्धेशने खास शब्दात तिल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धेश चव्हाणची खास पोस्ट
"आजच्या या खास दिवशी, आपलं नातं निर्माण केल्याबद्दल मी देवाचे खरंच खूप आभार मानू इच्छितो. आपल्या नात्यात तू नेहमीच भक्कम आधारस्तंभ राहिली आहेस. तुझा दिवस आणि हे येणारे वर्ष तुझ्या हास्यासारखे सुंदर जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह", असे सिद्धेशने म्हटले आहे.
पूजा सावंतची प्रतिक्रिया
सिद्धेशच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर पूजा सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. "धन्यवाद siddly तुझ्या या प्रेमळ शब्दांसाठी. आपला नवीन प्रवास सुरु करण्यासाठी आता मी आणखी वाट पाहू शकत नाही. मी या आणि अशा अनेक सुंदर क्षण एकत्र घालवण्यासाठी प्रतिक्षा करत आहे", अशी कमेंट पूजाने केली आहे. सध्या पूजा सावंत आणि सिद्धेशची ही इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पूजा सावंत मुंबईत लग्न करणार
दरम्यान पूजा सावंतने काही दिवसांपूर्वी We are engaged असे म्हणतं एक फोटो पोस्ट केला होता. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. तो ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. पूजाचं हे अरेंज मॅरेज आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला होता. सिद्धेश येत्या फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात येणार आहे. जर त्याला सुट्टी मिळाली, तर आम्ही चट मंगनी पट ब्याह अशा पद्धतीने लग्न करु शकतो. कारण 2025 या पूर्ण वर्षात मला अजिबात वेळ नाही. मला डेस्टिनेशन करायचं नाही. मी माझ्या मुंबईत लग्न करणार असे पूजाने म्हटले होते.