PHOTO : बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सईने लिहिलं....
तोसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
मुंबई : अनेकांच्या मनावर राज्य करणारी आणि मराठी कलाविश्वात फार कमी वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदांनी अनेकांनाच घायाळ करणाऱ्या सईने सध्या तिच्या एका फोटोमुळे अनेकांचच लक्ष वेधलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या चर्चा आणि त्यानंतर खुद्द सईनेच सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो पाहता बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत.
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या, नेहमीचच चाहत्यांना फॅशन गोल्स देणाऱ्या सईने चक्क तिच्या तथाकथित प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
तिने याविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली सली तरीही फोटोवरील कमेंट पाहता लगेचच या गोष्टीचा अंदाज लावता येत आहे. घनश्याम लालसा असं तिच्या कथित प्रियकराचं नाव असून, त्यानेही सईच्या फोटोवर विनोदी कमेंट केली आहे.
पिवळ्या रंगाच्या हृदयाच्या आकाराचा इमोजी सईने या फोटोच्या कॅप्शनमध्ये वापरला आहे. ज्यानंतर घनश्यामने कमेंट करत, हा फोटो दिवाळीच्या निमित्ताने पोस्ट करण्यात आल्याचं म्हटलं.
त्याच्या या कमेंटला त्याच अंदाजात उत्तर देत 'हो... फोटो थोडा उशिराच पोस्ट केल्यामुळे मला शिक्षा दे', असं लिहिलं. त्यावर 'मलाही महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचं आहे', अशी कमेंट त्याने केली.
घनश्याम आणि सईमधील हे संवाद आणि एकंदरच त्यांच्या नात्याविषयी होणाऱ्या चर्चा पाहता आता येत्या काळात हे दोघं त्याविषयी कोणती अधिकृत घोषणा करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुख्य म्हणजे घनश्यामही सोशल मीडियावर सईसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. तोसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, 'हायर', 'हंसा' या चित्रपटांतून तो झळकला आहे.