Tejaswini Pandit MNS Vardhapan Din Post : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षा जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचाही मुद्दा उपस्थित केला. याबद्दल आपण सविस्तर येत्या ९ एप्रिलच्या पाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी नमूद केलं. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आता एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता नुकतंच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने राज ठाकरे यांचा खास फोटोही पोस्ट केला आहे.  


आणखी वाचा : 'पैसे खर्च करुन, चित्रपटगृहात जाऊन...', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष


"18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची... पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा" असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे. त्याबरोबरच तिने '#वर्धापनदिन' असा हॅशटॅगही दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.



तेजस्विनीने याआधीही अनेकदा राज ठाकरे आणि मनसेबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. ती अनेक मुलाखतीतही राज ठाकरेंचे कौतुक करताना दिसते. तेजस्विनीने एका मुलाखतीमधून राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत, अशी इच्छाही व्यक्त केली होती.  काही दिवसांपूर्वी टोल वाढीवरुन मनसे आक्रमक पावित्रा घेतला होता. यावरही तेजस्विनीनेही आवाज उठवला होता.


विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितने खास पोस्ट शेअर केली होती. "राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो". असे तेजस्विनी पंडितने म्हटले होते.