'पैसे खर्च करुन, चित्रपटगृहात जाऊन...', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

तिचा पहिला-वहिला मल्याळम चित्रपट ‘मलाइकोट्टई वालीबान’  प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. 

Updated: Mar 9, 2024, 04:07 PM IST
'पैसे खर्च करुन, चित्रपटगृहात जाऊन...', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष title=

Sonalee Kulkarni Zee Chitra Gaurav Award : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. नटरंग चित्रपटातील अप्सरा आली या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली. सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली ही सध्या 'मलाईकोट्टाईवल्लीबन' या मल्याळम चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता सोनालीला प्रबळ व्यक्तिमत्त्व या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल तिने भावना व्यक्त केल्या आहेत. 

सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या हातात ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील एक ट्रॉफी पाहायला मिळत आहे. सोनालीला प्रबळ व्यक्तिमत्त्व या श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल तिने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत. 

आणखी वाचा : 'बाईपण'नंतर आता 'आईपण भारी देवा'! केदार शिंदेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा

सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट

"माझ्या व्यक्तिमत्वाला गौरवल्याबद्दल झी मराठी आणि झी चित्र गौरव पुरस्कारचे मनापासून आभार. हा पुरस्कार मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात “प्रबळ व्यक्तिमत्व” असलेल्या माझ्या “आई” ला समर्पित करते.  आणि आज महिला दिनानिमित्त माझ्या तमाम महिला प्रेक्षक वर्गाचे आभार मानते…. आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून, पैसे खर्च करून, तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन तुम्ही आमचे सिनेमे पाहता, भरभरून प्रेम करता, आशिर्वाद देता ….. आपल्या कुटुंबात सामिल करून घेता, शतशः नमन", असे सोनाली कुलकर्णीने म्हटले आहे. 

आणखी वाचा : कॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral

दरम्यान, सोनाली कुलकर्णी आतापर्यंत अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री म्हणून ती सतत प्रसिद्धीझोतात असते. तिने आतापर्यंत 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'तमाशा लाईव्ह' यांसारख्या अनेक चित्रपटांत काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा पहिला-वहिला मल्याळम चित्रपट ‘मलाइकोट्टई वालीबान’  प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या 22 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.