मुंबई : झी मराठी वरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला' चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली. पण ही जोडी खऱ्या आयुष्यात जेव्हा एकत्र आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर ही जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले. राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Hardik Joshi-Akshaya Deodhar) यांचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिय असलेल्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता खऱ्या आयुष्यातीलही या दोघांच्या जोडीला  चाहते पसंती देताना दिसत आहेत. दरम्यान, त्या दोघांची केमिस्ट्री ऑनस्क्रिन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मात्र नुकतेच अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. 


शेअर केलेल्या या फोटो अंजली बाई खूप सुंदर दिसत आहे. नवरी सारखं नटलेलं पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. सध्या श्रावण सुरु आहे. आणि श्रावण म्हटलं की, मंगळागौर ही आलीच. श्रावणात लग्न झालेल्या स्त्रियांचा लाडका सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर खेळण्यासाठी स्त्रिया आनंदात एकत्र येतात आणि मंगळागौर साजरी करतात.


अशातच अभिनेत्री अक्षया देवधर लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षयाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अक्षयाने काही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  अक्षया देवधर मंगळागौरीसाठी तयार झालेली  दिसतेय.



नुकतेच मंगळागौरीसाठी अक्षयाने सुंदर मेहंदीही काढली होती ज्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते. गोल्डन रंगाच्या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तर हार्दिकने देखील गोल्डन रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. दोघांचाही जोडा लक्ष्मी नारयणासारखा दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणण आहे.


फोटो शेअर करत अक्षयाने मंगळागौर पुजन… असं कॅप्शन दिलं आहे. अनेकानी अक्षयाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, लय भारी जोडी आहे अंजली बाई राणा दादा. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, टवका का दिस्तिय जोडी तर अजून एकाने लिहीलंय, दोघेही काय कमाल दिसताय तर अजून एकजण म्हणालाय, किती गोड दिसत आहे तुम्ही दोघे एक नंबर. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या दोघांच्या फोटोवर करत आहेत.