मुंबई :  मराठी सिनेमांची भूरळ हिंदी सिनेसृष्टीलादेखील पडली आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन त्यावर चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड आजकाल मराठी सिनेमांमध्ये आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित 'उबुंटू' आणि 'बॉईज' असे दोन मराठी चित्रपट या महिन्यात लागोपाठ प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटाचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर या दोन्ही चित्रपटाचे ट्रेलर शेअर करताना मराठी सिनेसृष्टीत होणार्‍या नव्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.  नुकतीच अमिताभ बच्चन यांनी ' बॉईज' या चित्रपटातील बालकलाकारांसोबत एक सेल्फी क्लिक केला. या लहान मुलांना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी आशिर्वादही दिले. 



 


  सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची निर्मिती असलेल्या 'बॉईज' या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. अवधूत गुप्ते प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येणारआहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमेनिस आणि वैभव मांगले या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर  पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हे तीन बाल कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.