मुंबई: मुंबई आणि पुण्याचं नातं हे अनेकांसाठी शब्दांत मांडणं कठिणच. पण दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी हेच नातं चित्रपटाच्या माध्यमातून मांडत अगदी सुरेखपणे सर्वांसमोर सादर केलं. मुंबईची मुलगी आणि पुण्याचा मुलगा यांच्यामध्ये होणारी भेट आणि त्यानंतर त्या भेटीतच पुढे मैत्रीत आणि प्रेमात होणारं रुपांतर या सरळ साध्या कथानकाला पुढे आणत आता हा प्रवास पोहोचला आहे त्याच्या तिसऱ्या टप्प्यावर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे तिसरा टप्पा असं म्हणण्याचं कारण म्हणजे 'मुंबई-पुणे-मुंबई ३' या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या सुरेख केमिस्ट्रीची झलक या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. 


मुख्य म्हणजे आता या दोघांमध्येही एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याचंही या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. .



स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना या चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. 


चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कमाईच्या आकड्यांमधूनही ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे आता गौतम आणि गौरीच्या आयुष्यात येणारं नवं वळण प्रेक्षकांना भावणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या वर्षअखेरीस म्हणजेच ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.