Swargandharva Sudhir Phadke Name In Offical Entry of Oscars​  सुसुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे.  बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून 29 चित्रपट या स्पर्धेसाठी विचारात घेतले आहेत. त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे.  याबाबत दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, "ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या या वर्षातील सर्वोत्तम २९ चित्रपटांच्या यादीत “स्वरगंधर्व सुधीर फडके” या चित्रपटाची निवड होणे, हे खूप अभिमानास्पद आहे. निर्माते, लेखक- दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचे प्रामाणिक कष्ट यामागे असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला हा क्षण आनंद देणारा ठरला. जगातील मोठा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या यादीत आपल्या चित्रपटाचा शेवटच्या फेरीपर्यंत विचार केला जाणे, हे अतिशय मोठे समाधान देणारे आणि पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा देणारे आहे.'' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : 'क्या लगा कहानी खत्म हो गई?' सिंहासनासाठी परतली मंजुलिका! 'भूल भुलैया'चा थरकाप उडवणारा टीझर पाहा


सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.