उधळलेल्या बैलाला प्राजक्ताने `असं` केलं शांत, `महाराष्ट्राची हास्यजत्रा`च्या दिग्दर्शकांनी शेअर केला व्हिडीओ
या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती `महाराष्ट्राची हास्यजत्रा` कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यांनी नुकतंच एक किस्सा सांगितला आहे.
Tuja Maja Sapan Serial Shooting : छोट्या पडद्यावरील सर्वच मालिका या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या सर्वच मालिकेत उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळतात. सोनी मराठी वाहिनीवरील तुजं माज सपान ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. ‘तुजं माज सपान’ मालिकेतील अभिनेत्री पैलवान प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती उधळलेल्या बैलासोबत शूटींग करताना दिसत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यांनी नुकतंच एक किस्सा सांगितला आहे.
सचिन गोस्वामी हे कायमच विविध विषयासंदर्भात पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकतंच सचिन गोस्वामी यांनी 'तुजं माजं सपान' या मालिकेचा पडद्यामागील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री प्राजक्ता ही उधळलेल्या बैलाला मोठ्या शिताफीने काबूत आणताना दिसत आहे. तसेच ती त्या बैलाची काळजी घेतानाही दिसत आहे. याच कारणांनी सचिन गोस्वामी यांनी प्राजक्ताच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
सचिन गोस्वामींनी केले प्राजक्ताचे कौतुक
"तुजं माजं सपान या सोनी मराठी वरील मालिकेतील नायिका पैलवान प्राजक्ता ही मुळातच एक कुस्तीपटू आहे..साताऱ्यातील एका गावात, शेतकरी कुटुंबात वाढलेली प्राजक्ता आता एक यशस्वी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. आमच्या वेटक्लाउड प्रॉडक्शन्स च्या या तुजं माजं सपान या सोनी मराठी वरील दैनंदिन मालिकेत नुकतच एक साहस दृश्य चित्रित झालं .यात एका उधळलेल्या बैलाला प्राजक्ता शिताफीने काबूत आणते आणि शाळकरी मुलांचा जीव वाचवते.
या चित्रीकरणाच्या निमित्ताने प्राजक्ताच्या धडाडीचे कौतुक वाटले . अनोळखी प्राण्या सोबत चित्रीकरण हे अत्यंत जिकिरीचे काम .. त्यात उधळलेला बैल सावरणे..त्या साठी अनेकदा प्रत्येक शॉट साठी त्या बैला सोबत अभिनय करायचा हे सगळं कठीण काम प्राजक्ताने अगदी सहजतेने केलं. या मागे तिचं गावात, शेतात,विविध प्राण्यांच्या सोबत घालवलेल्या काळाचा अनुभव कमी आला.. प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री तर आहेच पण कुस्तीपटू आणि शेती कन्या आहे.. प्राजक्ताच्या या धाडसाचे कौतुक आणि तिच्या मातीशी घट्ट असलेल्या नात्याचा आदर वाटतो.. प्राजक्ता तुला खूप शुभेच्छा.. प्रेक्षकहो,हा भाग नक्की बघा...( हे साहस दृश्य तज्ज्ञ मार्गदर्शकांचे देखरेखीत झालं आहे)", असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.
दरम्यान तुजं माज सपान या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. क्षेत्र मग ते कुठलंही असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्यं यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. हीच बाब 'तुजं माजं सपान' या मालिकेतून अधोरेखित करण्यात आली आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पहिलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा दाखवली जात आहे. सध्या या मालिकेत वीरूसंगे प्राजक्ताच्या पैलवानकीचा प्रवास दाखवला जात आहे.