मुंबई : लग्नबंधनात अडकत आपल्या अनोख्या इनिंगची सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनात चांगलीच रुळली असल्याचं पाहायला मिळत आहे. ती रुळली आहे, म्हणण्यापेक्षा या नव्या जीवनात तिने पतीसोबत एक वेगळं विश्वं उभं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या सेलिब्रिटी जोडीने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहता सहज याचा अंदाज येत आहे. ही अभिनेत्री म्हणजे तन्वी पालव. काही दिवसांपूर्वीच तिने मल्याळम अभिनेता आणि गायक सिद्धार्थ मेनन याच्याशी लग्नगाठ बांधली. ज्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या दोघांनीही त्यांच्या लग्नाची आनंदवार्ता सर्वांपर्यंत पोहोचवली. 


सध्या हे नवविवाहित दाम्पत्य अर्थात ही सेलिब्रिटी जोडी चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे सिद्धार्थच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे. ज्यामध्ये तन्वी ही सुरेख असं नृत्य करताना दिसत आहे. तर, सिद्धार्थच्या गायनकलेची झलकही या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. पचीच्या स्वरांवर ठेका धरणाऱ्या तन्वीच्या नृत्यकौशल्यासोबतच या दोघांच्याही चेहऱ्यावर कलेच्या सादरीकरणातून उमटणारा आनंद पाहण्याजोगा आहे. 



...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी


सर्वसामान्य जोड्यांपेक्षा आपण दोघंही काहीसे हटके आहोत, अशा आशयाचं कॅप्शन सिद्धार्थने या व्हिडिओला दिलं आहे. सोबतच एकत्र असताना आपण दोघंही अतिशय आनंदात असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली आहे. थोडक्यात काय, तर फक्त आयुष्याच्याच वाटेवर नव्हे, तर कलाकार म्हणूनही तन्वी आणि सिद्धार्थ खऱ्या अर्थाने एकमेकांची साथ देत आहेत.