मुंबई : मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकण हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. हा खिताब जिंकण हा एक अभिमान असतो. खिताब जिंकण्यासाठी, अनेक देशांतील मॉडल या वेगवेगळ्या परिक्षा देतात, परंतु वाढत्या वयाबरोबर स्त्रिया हे स्वप्न मागे सोडतात. अशा परिस्थितीत लग्नानंतरही हे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच मिस युनिव्हर्स स्पर्धेचे नियम बदलले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉक्स न्यूजनुसार, 2023 मध्ये होणार्‍या या स्पर्धेत विवाहित आणि पालक दर्जाच्या महिलाही या स्पर्धेसाठी पात्र असतील. 2023 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या 72 व्या आवृत्तीपासून नियम लागू होतील. यापूर्वी केवळ 18 ते 28 वर्षे वयोगटातील अविवाहित महिलाच यात सहभागी होऊ शकत होत्या. 


आणखी वाचा : बापरे! ५ हजार कोटींची प्रॉपर्टी तरी सैफच्या मुलांना मिळणार नाही एक रुपया, जाणून घ्या कारण


स्पर्धेच्या अंतर्गत मेमोमध्ये म्हटले आहे की, 'आमच्या सर्वांचा असा विश्वास आहे की महिलांना त्यांच्या जीवनावर पूर्ण अधिकार असावा. यासोबतच त्यांनी वैयक्तिकरित्या घेतलेला कोणताही निर्णय त्यांच्या यशात अडथळा निर्माण करू नये.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मिस युनिव्हर्स 2020 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या एंड्रिया मेजानं या निर्णयाचे समर्थन केले आहे. 'वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे. महिला आता नेतृत्वाच्या पदांवर विराजमान होत आहेत. यापूर्वी केवळ पुरुषच या पदांवर पोहोचू शकत होते. आता वेळ आली आहे की सौंदर्य स्पर्धांमध्येही बदल व्हायला हवा. कुटुंबातील महिलांनीही सहभाग घ्यावा', असं ती म्हणाली


आणखी वाचा : बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आलियाकडून रणबीरला धोका?


2021 मध्ये झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला. इस्रायलमधील इलात येथे ही स्पर्धा पार पडली. सगळ्यात आधी 1994 मध्ये सुष्मिता सेननं आणि दुसरा लारा दत्तानं 2000 मध्ये जिंकला होता.