मुंबई : सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक - संगीतकार बप्पी लहरी यांचं एक गाणं मार्वल स्टूडिओ चित्रपटाचा हिस्सा बनण्याची शक्यता आहे. बप्पी लहरी यांनी यासंबंधी स्वत: खुलासा केला असून मार्वल स्टूडिओशी बोलणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याआधी बप्पी लहरींचं 'झूम झूम झूम बाबा' गाणं २०१७ साली आलेल्या अमेरिकी फिल्म 'गॉर्जियस ऑफ द गॅलेक्सी २'च्या हिंदी भाषेतील प्रोमोशनल क्लिपमध्ये दाखवण्यात आलं होतं. मार्वलच्या आगामी चित्रपटात बप्पी लहरी गाणं गाणार असल्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बप्पी लहरी यांनी 'माझ्या गाण्याबाबत मार्वल स्टूडिओशी चर्चा सुरू आहे. 'गॉर्जियस ऑफ द गॅलेक्सी २' मध्ये माझं गाणं प्रसिद्ध करण्यात आलं होतं. 'गॉर्जियस ऑफ द गॅलेक्सी २'चा प्रॅट क्रिस याला माझं गाणं आवडलं होतं. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटासाठी माझं गाणं असण्याची शक्यता आहे. मी एप्रिलमध्ये हॉलिवूडमध्ये जात असल्याचं' त्यांनी म्हटलं आहे.  


बप्पी लहरी सोनी एंटरटेनमेंटच्या 'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मी अनेक चित्रपटात काम केलं आहे. ज्यात कलाकारही सामिल होते. मी 'इंडियन आयडल' केलं होतं. परंतु 'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमातून मी पहिल्यांदाच टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. 'लेडीज स्पेशल' ही आजची रेल्वेतून प्रवास करणाऱ्या आणि आपल्या प्रवासादरम्यान मित्र बनवणाऱ्या महिलांची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं. या शोमध्ये त्यांनी प्रतिभासंपन्न व्यक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या संगीतकाराची भूमिका साकारली आहे. मी खऱ्या आयुष्यातही नेहमी नवीन गायकांना प्रोत्साहित केलं आहे. या कार्यक्रमातील माझी भूमिका खऱ्या जीवनात मी जसा आहे तशीच साकारत असल्याचं बप्पी लहरी यांनी म्हटलंय.  ॉ



५० वर्षांच्या कलाविश्वातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. यंदाच्या वर्षात ते एका संगीतमय चित्रपटाचे दिगेदर्शन करणार आहेत. 'एक अधूरा संगीत' या चित्रपटाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. माझ्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी अनेक लोक संपर्क करत आहेत. याबाबत अद्याप स्पष्टता नाही परंतु बायोपिक या वर्षात सुरू होण्याची शक्यता असून चित्रपटात रणवीर सिंह माझी तरूण भूमिका साकारणार असल्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.