Matthew Perry Death: नशेच्या आहारी, मग तुटला साखरपुडा...; Friendsचा `चँडलर बिंगसोबत काय घडलं होतं?
मॅथ्यू पेरीच्या चाहत्यांसाठी शनिवार एक दुःखद बातमी घेऊन आला. , 54 वर्षिय मॅथ्यू पेरीचं लॉस एंजेलिस येथील घरी निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : मॅथ्यू पेरीच्या चाहत्यांसाठी शनिवार एक दुःखद बातमी घेऊन आला. , 54 वर्षिय मॅथ्यू पेरीचं लॉस एंजेलिस येथील घरी निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. न्यूज एजन्सी एपीच्या मते, मॅथ्यू पेरीचा शनिवारी 28 ऑक्टोबरला लॉस एंजेलिसमधील त्याच्या राहत्या घरात मृतदेह आढळला. मॅथ्यूच्या मृत्यूचं कारण हॉट टबमध्ये बुडणं असल्याचं सांगितलं जात आहे. 90 च्या दशकात प्रसिद्ध सिटकॉम 'फ्रेंड्स'मध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला.
लहानपणीच आई-वडील वेगळे झाले
19 ऑगस्ट 1969 रोजी जन्मलेला 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरी अवघ्या एक वर्षाचा होता जेव्हा त्याची आई सुझान मेरी आणि वडील जॉन बेनेट पेरी यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याच्या आईने कॅनडाचे पत्रकार किथ मॉरिसनशी लग्न केल. याच कारणामुळे मॅथ्यूकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांचे नागरिकत्व होते.
तरुण वयात हॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली
मॅथ्यू हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये अव्वल दर्जाचा टेनिसपटू होता. मात्र चित्रपटांमध्ये रुची असल्याने त्याने क्रीडा क्षेत्रात करिअर केलं नाही. वयाच्या १५ व्या वर्षी तो कॅनडा सोडून लॉस एंजेलिसला आला. त्याने ग्रॅज्युएशनही इथेच पुर्ण केलं. मॅथ्यूला पहिला ब्रेक टीव्ही मालिका 'सेकंड चान्स'मधून मिळाला होता, मात्र 90 च्या दशकात 'फ्रेंड्स' या अमेरिकन कॉमेडी सिरीजने त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
मॅथ्यू हा या सिरीजमधील सर्वात तरुण अभिनेता होता. 1994 ते 2004 पर्यंत चाललेल्या या सिरीजमधून मॅथ्यूने जगभरात प्रसिद्धी मिळवली. तो 'रोम-कॉम', 'फूल्स रश इन', 'द होल नाइन यार्ड्स'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.
मॅथ्यू पेरीचे प्रोफेशनल जीवन चांगलं होतं, मात्र त्याचे वैयक्तिक जीवन गोंधळाने भरलेलं होतं. 1997 मध्ये, जेव्हा मॅथ्यू त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि यशाच्या शिखरांना स्पर्श करत होता, तेव्हा त्याचा जेट-स्की अपघात झाला, ज्याने त्याला निकोटिनचं व्यसन लागलं. यानंतर त्याला अल्कोहलचं व्यसनही जडलं. टेक्सासमध्ये 'सर्व्हिंग सारा' चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्याच्या पोटात खूप दुखू लागलं आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अल्कोहोल आणि ड्रग्जमुळे मॅथ्यूला पँक्रियाटिस झाला होता. 2001 मध्ये ते या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुनर्वसनात गेला होता. ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरही गंभीर परिणाम झाला होता. हॉलिवूड स्टारने एकदा उघड केलं होतं की या व्यसनामुळे त्याला 'फ्रेंड्स'च्या सीझन 3 आणि 6 मधील तीन वर्षे आठवत नाही.
मॅथ्यू पेरीने कधीच लग्न केलं नाही
मॅथ्यू पेरीने अनेक अभिनेत्रींना डेट केलं असलं तरी त्याने कधीच कोणाशी लग्न केलं नाही. यास्मिन ब्लिथ, ज्युलिया रॉबर्ट्स आणि लिझी कॅप्लान यांच्याशी तो रिलेशनशिपमध्ये होता. 2020 मध्ये, त्याने साहित्य व्यवस्थापक मॉली हर्विट्झशी एन्गेजमेन्ट केली होती. मात्र, वर्षभरातच त्यांचा साकरपुडा तुटला. मॅथ्यूने साखरपुडा तुटल्याची घोषणा करत म्हटलं होतं की, "कधी-कधी गोष्टी फार काळ चालत नाही."