मुंबई : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'लग्नकल्लोळ' या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'सनई संग' असे बोल असणारं हे गाणं लग्नसमारंभात प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. मयुरी आणि भूषणवर चित्रित झालेले हे गीत अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून या गाण्याला स्वप्नील गोडबोले, प्रफुल कार्लेकर यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे, तर ह्याचे नृत्य दिग्दर्शन डान्स इंडिया डान्स फेम प्रिन्स यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहंदी समारंभातील हे गाणं अतिशय कलरफुल असून यात लग्नाचा माहोल, सनई चौघडे, पाहुण्यांची लगबग, तरुणाईचा उत्साह, मजा मस्ती धमाल दिसत आहे.  कपड्यांची रंगसंगती, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी नजरेला सुखावणाऱ्या आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित 'लग्नकल्लोळ'चे मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शक आहेत. तर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले असून  १ मार्च रोजी हे सनई चौघडे वाजणार आहेत. 


या गाण्याबद्दल सह दिग्दर्शक डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, " लग्नसमारंभ असला की जोश, उत्साह हा असतोच. असेच उत्साहाने भरलेले गाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला ठेका धरायला लावेल, असे हे गाणे आहे. यात मयुरी आणि भूषण यांच्या नृत्यात भन्नाट एनर्जी दिसत आहे. त्यात  म्युझिक टीमही अतिशय कमाल असल्याने या गाण्यात अधिकच रंगत आली आहे. प्रत्येक लग्नसमारंभात वाजेल असे हे गीत आहे.''


मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझरही काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. टिझर आणि गाणी पाहिल्यानंतर प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.