मुंबई :   "अपने पास बोहोत पैसे है"! असं म्हणत सर्वांना आपल्या प्रेमात पाडणारी बालकालाकार मायरा वायकुळ (mayra vaikul) सध्या तुफान चर्चेत आहे. त्याला कारण देखील असच आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेच्या पहिल्या प्रोमोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही मालिका लवकरचं चाहत्याचा निरोप घेणार आहे. त्यामुळे परीचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवारी मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्यात आला. शेवटचं शूट असल्यामुळे सर्व कलाकार चांगलेच भावूक झाले. (mayra vaikul Emotional Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायराने देखील खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचा निरोप घेतला आहे. व्हिडीओ शेअर करत परी म्हणतेय,  'माझी तुझी रेशीमगाठी मालिकेचा 'परी' म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा. सध्या सोशल मीडियावर तिच्या पोस्टची चर्चा आहे. (Mazhi Tuzhi Reshimgath last episode)



फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'बाय बाय यश समीर..काल आम्ही यश आणि समीर म्हणुन “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतला शेवटचा सीन शूट केला ..' असं लिहिलं आहे. (Yash and sameer friendship)


आता, मागचं एक वर्ष मायरा दररोज परी म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे चाहत्यांनी धक्का बसला आहे. कारण चाहत्यांना परीला रोज भेटता येणार नाही..