मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे एकत्र दिसत आहेत. या मालिकेत नेहा कामतची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे साकारते आहे. तर बालकलाकार मायराच्या अभिनयाची देखील खुप चर्चा रंगली आहे. मालिकेतील तिचा निरागस अभिनय सर्वांचीच मनं जिंकतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. विशेष म्हणजे मानधनाच्या बाबतीत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत इतर कलाकारांना तोडीस तोड आहे असं म्हणता येईल. कारण मायराचं मानधन ही काही कमी नाही. प्रत्येक एपिसोडसाठी मायरा मोठी रक्कम आकारते आहे.



मायराचं सोशल मिडीयावर मोठं फॅन फॉलोविंग आहे. मायरा फक्त चार वर्षांची आहे. ही चिमुकली एका भागासाठी तब्बल 10 हजार रुपये मानधन घेते.  


मायरा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच नवनवीन लूकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.